उल्लेखनीय

.

उल्लेखनीय सहभाग:

1) सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार प्रायोजित व श्री युनिव्हर्सिटी आयोजित दिनांक 11 ते 13 मार्च 2016 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘विश्व संस्कृतिक महोत्सवा’त तबला वादन.
2) आर्ट ऑफ लिविंग च्या वतीने दिनांक 17 जानेवारी 2012 रोजी आयोजित ‘तालनिनाद’ या विश्वविक्रमी कार्यक्रमात तबलावादन.या कार्यक्रमाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली आहे.
3) स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त दिनांक 15 ऑगस्ट 1997 आली नेहरू युवा केंद्राच्या वतीने आयोजित राजपथावरील मार्च व सांस्कृतिक कार्यक्रमात यशस्वी सहभाग.
4) राजस्थान सरकार प्रायोजित व राष्ट्रीय युवा योजना आयोजित जयपूर येथे राष्ट्रीय एकात्मता शिबिरात यशस्वी सहभाग.थोर समाजसेवक श्री एस. एन.सुब्बाराव यांच्या मार्गदर्शनाखाली कानोता धरणावर श्रमदान व जयपूर शहरात सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
5) युवा व खेळ मंत्रालय भारत सरकार आयोजित दिनांक 12 ते 16 जानेवारी 2012 या कालावधीत मेंगलोर कर्नाटक येथे संपन्न झालेल्या 17 व्या ‘राष्ट्रीय युवक महोत्सवा’त यशस्वी सहभाग.
6) भारतीय विश्वविद्यालय संघटना नवी दिल्ली आयोजित एसएनडीटी विद्यापीठात दिनांक 14 ते 15 ऑक्टोबर 1998 या कालावधीत पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ राष्ट्रभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत स्वरातीम विद्यापीठ नांदेड चे नेतृत्व.
7) महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या व कोल्हापूर विद्यापीठाने दिनांक 3 ते 5 ऑक्टोबर 1998 या कालावधीत आयोजित केलेल्या आंतरविद्यापीठीय पातळीवर एड्स जनजागृती व शास्त्रीय संगीताच्या कार्यशाळेत स्वारातीम विद्यापीठ नांदेड चे नेतृत्व.
8) सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित दि.19/02/1995 ते 10/03/1995 या कालावधीत लातूर येथे बालनाट्य प्रशिक्षण शिबिराच्या अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला.
9) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आयोजित 1994 (अमरावती)1995 (बीड) 1996 (सांगली)येथे राज्यस्तरीय लोकनृत्य,एकांकिका व तबलावादन स्पर्धेत यशस्वी सहभाग.
10) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय युवक महोत्सव 2011-12 मध्ये आमच्या दयानंद कला महाविद्यालयाचे लोकनृत्य महाराष्ट्रात सर्वप्रथम आले.या युवक महोत्सवात मार्गदर्शक म्हणून सहभाग.
11) महाराष्ट्र राज्य कामगार मंडळाद्वारे आयोजित राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत तीन वेळा,लावणी स्पर्धेसाठी दोन वेळा व राज्यस्तरीय संस्कृतिक महोत्सव नागपूर येथे यशस्वी सहभाग.
12) राज्यस्तरीय वाणिज्य परिषदेत भांगडा नृत्य सादर.
13) विद्यार्थीदशेत स्वरातीम विद्यापीठाने आयोजित केलेल्या केंद्रीय युवक महोत्सवात सतत तीन वर्ष तबलावादन स्पर्धेत रौप्यपदक.
14) विद्यापीठाने आयोजित केंद्रीय युवक महोत्सवात लोकगीत,पोवाडा,एकांकिका प्रहसन, मुकाभिनय,समूहगीत इत्यादी कला प्रकारात सहभाग व पारितोषिके प्राप्त

सांगीतिक मार्गदर्शक:-

1) स्वारातीम विद्यापीठ नांदेड आयोजित युवक महोत्सव आयोजित दयानंद कला महाविद्यालय,लातूरच्या संघासाठी 1999 पासून शास्त्रीय तालवाद्य,लोकवृंद वादन,पोवाडा व इतर सांगीतिक प्रकारांचे मार्गदर्शक म्हणून कार्य.
विशेष म्हणजे दयानंद कला महाविद्यालयास मागील 10 वर्षांत 4 वेळा विजेतेपद व 5 वेळा उपविजेते पद मिळाले आहे.

परिक्षक:

1) सोलापूर विद्यापीठ,सोलापूर आयोजित युवक महोत्सवात येथे 4 वेळा परिक्षक म्हणून कार्य.
2) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद येथे 3 वेळा परिक्षक म्हणून कार्य
3) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव येथे 1 वेळा परिक्षक म्हणून कार्य
4) महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापीठ ,नासिक येथे 2 वेळा परिक्षक
5) कृषी विद्यापीठ,परभणी आयोजित युवक महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित.
उपरोक्त विद्यापीठात विद्यापीठात,वासुदेव, लोकसंगीत,लोकवृंदवादन,तालवाद्य,सुगम संगीत,लोकनृत्य ,समूह गायन ,शास्त्रीय संगीत इ कलाप्रकाराचे तज्ज्ञ परिक्षक म्हणून कार्य केले.
याशिवाय अ.भा.गांधर्व मंडळाच्या प्रारंभिक ते संगीत अलंकार(एम.ए.)परीक्षांसाठी परिक्षक म्हणून कार्यरत.

विशेष निवडी/ नियुक्त्या:

१) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड येथे ‘अधिसभा(सिनेट)सदस्य’म्हणून कार्यरत.
२) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च्य माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे येथे कलाशिक्षण अभ्यास मंडळावर ‘निमंत्रक’ म्हणून कार्य.
३) राज्य शासनाच्या शिक्षण विभागाचे मुखपत्र असलेल्या ‘शिक्षण संक्रमण’या मासिकासाठी लेखक म्हणून कार्यरत.
४) राष्ट्रीय सेवा योजना ‘लातूर जिल्हा समन्वयक’ म्हणून कार्यरत.
५) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र्र विद्यापीठ,जळगाव येथे परफॉरमिंग आर्टस तदर्त अंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेवर अभ्यासमंडळ सदस्य म्हणून नामनिर्देशन करण्यात आले आहे.
६) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ,बालभारती,पुणे येथे भारतीय संगीत विषय अभ्यास गटावर सदस्य म्हणून कार्यरत आहे.
७) राज्य शासनाच्या कला गुणवाढ समितीवर कार्य:-
*शास्त्रीय कला,चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या इ.१० वीच्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी म.रा.मा.व उ.मा.शिक्षण मंडळाने स्थापन केलेल्या समितीत “विषय तज्ज्ञ” म्हणून सहभाग.
८) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यकारी परिषदेवर स्वारातीम विद्यापीठ,नांदेड विद्यापरिषधेच्या वतीने नामनिर्देशन.

महाविद्यालयातील लोककला चळवळ:-

दयानंद कला महाविद्यालय,लातूर येथे अध्यापन करत असतांना शेकडो विद्यार्थ्यांना लोककलेचा शिक्षण दिले.यातून अनेक लोककलावंत निर्माण झाले.यात शिवशाहीर संतोष साळुंके,अभिजित जाधव(मर्द मराठ्यांच पोर),राजन सरवदे(मर्द मराठ्यांच पोर),वैभव माने(लोकगीतं गायक)मयुरी आवड(नृत्यांगना),माधुरी आवड(लावणी),प्रतिज्ञा गायकवाड,प्रियंका बनसोडे(प्रबोधनात्मक आंबेडकरी जलसा)निलेश पाठक,विनायक राठोड व सुराज साबळे (ढोलकी व तबला वादन)इ.अनेक लोककलावंत आज प्रबोधन करीत आहेत.

भारुडे:-

स्वारातीम विद्यापीठ नांदेड यांच्या वतीने आयोजित अंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवासाठी सामाजिक समस्या निर्मुलन करण्याऱ्या भारुडाचे लेखन केले.यातील अनेक भारुडांना पारितोषिके मिळाली.

आंबेडकरी जलसे:-

युवक महोत्सवातील स्पर्धांसाठी काही प्रबोधनात्मक आंबेडकरी जलसे लिहिले.त्या जलस्यांना विद्यापीठस्तरावर पारितोषिके मिळाली.

लोकवृंद वादन:-

विविध लोकवाद्ये लोप पावत असतांना विद्यापीठ स्तरावर लोकवृंद वादन (फोक ऑर्केस्ट्रा) या प्रकारची स्पर्धा सुरू झाली.या स्पर्धेत दयानंद कला महाविद्यालयाने मागील 7 वर्षात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.

विद्यापीठात लोककला स्पर्धां आयोजनाचा आग्रह:-

लोककलांचे संवर्धन व्हावे यासाठी स्वारातीम विद्यापीठ,नांदेड येथे अंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात वासुदेव,भारुड,भजन व गोंधळ या स्पर्धा पूर्ववत चालू ठेवाव्यात यासाठी अधिसभेत ठराव मांडला.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संगीत परिषदेतील सहभाग:-

१)आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषद
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आयोजित “समाज कल्याणात मनोरंजक क्रियाकलाप व संगीताची भूमिका” या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग दि 9 व 10 मार्च 2015
2)यु.जी.सी.प्रायोजित “भारतीय संगीतात महिलांचे योगदान” याविषयी औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय परिषदेत सहभाग.दि 30 व 31 ऑगस्ट 2013
3)यु.जी.सी.प्रायोजित “मायक्रोफोन टेक्निक्स फॉर सिंगर्स” या विषयावर अमरावती येथे संपन्न झालेल्या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेत सहभाग.दि.1 ऑगस्ट 2015.
4)यु.जी.सी.प्रायोजित व शिवाजी महाविद्यालय बार्शी आयोजित “संगीतातून व्यवसायाच्या संधी” याविषयी आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत सहभाग दि 22 व 23 जानेवारी 2014.
5)यु.जी.सी.प्रायोजित बुलढाणा येथे संपन्न झालेल्या “संगीत के प्रवाह में भजन की सांप्रदायिक विभिन्नता”या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत सहभाग दि 22 व 23 जानेवारी 2015.
6)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित”मानवी जीवनात संगीताचे महत्व”याविषयी आयोजित मालेगाव कॅम्प येथे संपन्न झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत सहभाग.दि.11 व 12 फेब्रुवारी 2017.

कार्यशाळा सहभाग:-

1)शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर यांच्या वतीने दि.3 ते 5 ऑक्टोबर 1997 या कालावधीत ‘भारतीय शास्त्रीय संगीत’ या विषयावर आयोजित अंतरविद्यापीठीय कार्यशाळेत सहभाग.
2)अ.भा.गांधर्व म.मंडळ,मुंबई आयोजित दि.12 व 13 ऑक्टोबर 2014 या कालावधीत ‘संगीत शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत’ सहभाग.
3)अ.भा.गांधर्व म.मंडळ,मुंबई यांच्या वतीने दि.18 ते 19 जुलै 2015 रोजी आयोजित “संगीत शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळे”त सहभाग.

राष्ट्रीय चर्चासत्रे:-

1)यु.जी.सी.प्रायोजित यवतमाळ येथे संपन्न झालेल्या”मानवाच्या सर्वांगीण विकासात संगीताची भूमिका”या विषयावरील राष्ट्रीय सेमिनार मध्ये सहभाग.दि.17 ऑक्टोबर 2013.
2)यु.जी.सी.प्रायोजित वर्धा येथे संपन्न झालेल्या “21 व्या शतकातील संगीताची दिशा व क्षितिजे” या विषयावरील राष्ट्रीय सेमिनारमध्ये सहभागी.दि.10 ऑक्टोबर2013
3)यु.जी.सी.प्रायोजित यवतमाळ येथे संपन्न झालेल्या “संतांचे भारतीय संगीतातील योगदान”या विषयावर झालेल्या राष्ट्रीय सेमिनार मध्ये सहभाग.दि.4 फेब्रुवारी 2014.
4)यु.जी.सी.प्रायोजित “विविध घराण्यांची राग चर्चा” या विषयावर यवतमाळ येथे संपन्न झालेल्या एकदिवसीय राष्ट्रीय सेमिनार मध्ये सहभाग.दि.13 डिसेंबर 2014.
5)यु.जी.सी.प्रायोजित “भारतीय विचारवंत,समाजसुधारकांचे योगदान” या विषयावर यवतमाळ येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय सेमिनारमध्ये सहभाग दि.25 सप्टेंबर 2013