इतर उपक्रम

सामाजिक दायित्व:-

| 1993 साली लातूर जिल्ह्यात भूकंप झाला पुनर्वसनासाठी मनुष्यबळ कमी पडत होते अशा वेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकाऱ्यांनी भूकंपग्रस्त क्षेत्रातील आपद्ग्रस्तांसाठी धडक प्रशिक्षण योजना राबविली.यात 500 आपदग्रस्तांना “ट्रेनर शिक्षक” म्हणून बांधकामाचे व सुतारकामाचे प्रशिक्षण दिले.
| मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने भूकंपग्रस्तांसाठी विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिनांक १६ ते २५ डिसेंबर १९९३ या कालावधीत भूकंपग्रस्त चिंचोली जोगन,तालुका औसा,जिल्हा लातूर येथील शिबिरात यशस्वी सहभागी होऊन सांस्कृतिक कार्यक्रमातून आपद्ग्रस्तांचे मनोबल वाढविले व पुनर्वसन कार्यात मदत केली. *विद्यार्थीदशेपासूनच रासेयोच्या वतीने आयोजित चिंचोली जोगन (१९९३)दर्जी बोरगाव (१९९४)व मुशिराबाद (१९९५)येथे दहा दिवस विशेष वार्षिक शिबिरात सक्रिय सहभाग.
| 2013 पासून दयानंद कला महाविद्यालय +2 स्तर रासेयो कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत
| मळवटी (2013),निवडा (2014),लखमापूर (2015),महापूर (2016),आनंदवाडी गौर (2017) आनंदवाडी गौर(2018) येथे हागणदारी मुक्त ग्राम करण्यासाठी शोषखड्डे, जलव्यवस्थापन,निर्मलग्राम,पाट बंधारे बांधणे,वनराई बंधारा बांधणे, ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन,साक्षरता,वृक्षारोपण,स्त्री सुरक्षा,स्त्री-आरोग्य,कॅशलेस व्यवहार प्रशिक्षण, योगा प्राणायाम शिबिर,शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण,पल्स पोलिओ जनजागृती,गावाची आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण,विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक व ग्रामस्थांसाठी प्रबोधनात्मक संस्कृतीक, कार्यक्रमाचे आयोजन केले.
| लातूर जवळील रामगिर नगर झोपडपट्टी या दलित वस्तीला दत्तक घेऊन तेथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या.साडी वाटप, आरोग्य शिबिर, होलिकोत्सव,ग्रंथालयाची सोय इ. उपक्रम राबविले
| 2016 पासून +2 स्तरावर राष्ट्रीय सेवा योजनेचा लातूर जिल्हा समन्वयक म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी नियुक्ती केली.
| जिल्ह्यातील सर्व रासेयो केंद्र क्रियाशील करण्यासाठी प्रयत्न चालू.
| लातूर फेस्टीवलच्या वतीने दिनांक 9 जानेवारी 2014 रोजी प्रदूषणमुक्त शहरासाठी आरोग्य संवर्धनासाठी व शहरवासीयांकरिता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या संयोजन समितीत सक्रिय सदस्य म्हणून सहभाग.
| 2014 साली लातूर जिल्ह्यातील लातूर जिल्ह्यात गारपीट झाली त्यामुळे चैत्रपल्लवी संगीताचे आयोजन न करता सर्व सदस्यांनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 हजार रुपयाची मदत केली.
| युवक मंत्रालय नवी दिल्ली अहमदनगर महाविद्यालय अहमदनगर आयोजित दिनांक 12 ते 18 ऑगस्ट 2013 या कालावधीत ओरिएंटेशन कोर्समध्ये यशस्वी सहभाग.
| 2016 मध्ये मुलीचा वाढदिवस साजरा न करता तहानलेले लातूरकरांसाठी सुरू झालेल्या जलयुक्त लातूर योजनेसाठी 11,101 रुपयांची आर्थिक मदत केली.
| आतापर्यंत बारा वेळा रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली

अभ्यास पूरक व अभ्यासेतर उपक्रम

1)उत्कृष्ट वाचक योजना:-
वर्गातील विद्यार्थ्यांनी वाचन करावे यासाठी वर्षभरात जे अधिक वाचन करतील अशा विद्यार्थ्यांना उत्कृष्ट वाचक म्हणून स्नेहसंमेलनात गौरवीत करण्यात येते.त्या विद्यार्थ्यास रू.1051/- व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येते.
2)विद्यार्थ्यांची पुस्तक पेढी:-
आमच्या महाविद्यालयात 90000 पुस्तके आहेत.परंतु विद्यार्थ्यांनी पुस्तकासाठीही पैसे खर्च करावेत हा संस्कार रुजवावा यासाठी हा उपक्रम सुरू केला. विद्यार्थ्या स्वेच्छेने संगीत विभागाच्या पुस्तक पेढी साठी एक पुस्तक आणून देतात.
3)उत्कृष्ट वाचक पुरस्कार:-
महाविद्यालयातीळ जो विद्यार्थी अधिक पुस्तकांचे वाचन करतील आशा विद्यार्थाला स्नेहसंमेलनात रु 1051/-
4))स्वगुणवाढ योजना:-
विद्यार्थ्यांनी इतराशी स्पर्धा न करता स्वतःशी स्पर्धा करावी.यासाठी हा उपक्रम सुरू केला.इ.10 वी बोर्ड परिक्षतील गुणां पेक्षा 12 वी बोर्ड परीक्षेत जो विद्यार्थी सर्वाधिक गुण प्राप्त करेल त्याला स्नेहसंमेलनात रु 1000 चे पारितोषिक देऊन गौरविण्यात येते.
5)दयानंद कला वाहिनी:-
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना मुक्त व्यासपीठ मिळावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.यातून अनेक नर्तक,तबला वादक,गायक,अभिनेते निर्माण झाले.

व्याख्यानातून प्रबोधन

मराठवाड्यातील अनेक महाविद्यालयातील स्नेहसंमेलन विविध विद्यापीठातील युवक महोत्सवाचे उद्घाटन इत्यादी कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज व वर्तमान स्थिती स्वामी विवेकानंद यांचे शैक्षणिक विचार, गुरु-शिष्य परंपरा,युवकांसमोरील आव्हाने, अभ्यास एक तंत्र इत्यादी विषयांवर प्रबोधनात्मक व्याख्याने दिली.

नवोपक्रम

1)तिरंगा पदयात्रा:-
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दि 15 ऑगस्ट 2017 रोजी 72 मीटर लांबीच्या भव्यदिव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.लातूर अभाविप व दयानंद रासेयोच्या वतीने आयोजित या पदयात्रेत रासेयो स्वयंसेवक तर उपस्थित होतेच पण शेकडो नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
2)चिमण्यासाठी पाणपोई:-
जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून
20 मार्च 2018 यादिवशी चिमण्यासाठी व इतर पक्षांसाठी दयानंद संस्था परिसरात पाणपोई ची सोय करण्यात आली.
3)नवचेतना शिबीर:-
दि आर्ट ऑफ लिविंग यांच्या सहयोगाने दि 8 फेब्रुवारी 2016 रोजी दत्तक ग्राम लखामपूर येथे महिलांच्या आरोग्यासाठी ध्यान,प्राणायाम व सत्संगाचे आयोजन करण्यात आले.
4)हुतात्मा स्मारकाची स्वच्छता:-
17 सप्टेंबर 2017 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त लातूर शहरातील हुतात्मा स्मारकाची स्वच्छता करण्यात आली.
5)रोकड विरहित व्यवहाराचे प्रशिक्षण:-
दि.8 जानेवारी 2017 रोजी पुणे जनता बँकेच्या सहयोगाने महापूर येथील ग्रामस्थांना cashless व्यवहाराचे प्रशिक्षण देण्यात आले.
6)स्मशानभूमी स्वच्छता:-
दत्तक गाव आनंदवाडी गौर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक शिबिरात स्वयंसेवकांनी दि. 13 फेब्रुवारी 2018 रोजी स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्मशानभूमीची स्वच्छता केली.
7)कापडी पिशव्याचे वाटप:-
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त 22 एप्रिल 2018 रोजी मोफत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
8)स्वामी विवेकानंद स्मारक दत्तक योजना:
12 जानेवारी 2018 पासून युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाची स्वच्छता करण्यासाठी रासेयो ने दत्तक घेतले.
9)ऐतिहासिक किल्ला स्वच्छता मोहीम:-
दि.26 जानेवारी 2018 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून औसा जि.लातूर येथील निजाम कालीन किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली
10)एड्स जनजागृती रॅली:-
दि.1 जानेवारी रोजी जागतिक एड्स दिनानिमित्य जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सहयोगाने एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले
11)रांगोळीच्या सहाय्याने एड्स जनजागृती:-
दि 23 ऑगस्ट 2017 रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एड्स प्रतिबंध कार्यालय यांच्या सहयोगाने रांगोळी व पोष्टरच्या सहाय्याने एड्स जनजागृती करण्यात आली
12)सायकल रॅली:-
विश्व जैव इंधन दिनानिमित्य पेट्रोलियम मंत्रालय यांच्या सहयोगाने 8 ऑगस्ट 2017 रोजी सायकल रॅलीतुन पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली
13)भारतीय संस्कृती परीक्षा:-
दि 12 जानेवारी या दिवशी स्वामी विवेकानंद संस्था कन्याकुमारी यांच्या सहयोगाने भारतीय संस्कृती परीक्षेचे आयोजन करण्यात आले.
14)महात्मा गांधी विचार परिक्षा
महात्मा गांशी फाउंडेशन वर्धा यांच्या वतीने आयोजित गांधी विचार या परीक्षेचे आयोजन केले.
15)पर्यावरण पूरक होलिकोत्सव:-
दत्तक वस्ती रामगीर नगर येथे दि.12 मार्च 2017 रोजी होळी निमित्त पर्यावरण पूरक होलिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले
16)मतदार जनजागृती सप्ताह:-
दि 6 ते 12 फेब्रुवारी या कालावधीत मतदार जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.स्वाक्षरी मोहीम,व्याख्यान,शपथ,रॅली,भित्तीपत्रके,मानवी साखळी व दत्तक ग्राम महापूर येथे मतदार जनजागृती करण्यात आली.
17)जल साक्षरता रॅली:-
22 मार्च 2017 रोजी जागतिक जल दिना निमित जलसाक्षरता रॅलीचे आयोजन करण्यात आले
18)पाणपोई:-
हरंगुळ रेल्वे स्टेशन येथे मागील तीन वर्षांपासून पणपोई सुरू करण्यात आली
19)जैविक शेती विषयी कार्यशाळा:-
दत्तक गाव लखामापूर येथे जैविक पद्धतीचा अवलंब कसा करावा व शेतीचे उत्पादन कसे वाढवावे याविषयी दि आर्ट ऑफ लिविंग यांच्या सहयोगाने कार्यशाळेचे आयोजिन करण्यात आले.
20)आर्ट ऑफ लिव्हिगच्या कोर्सेसचे आयोजन:-
जीवन जगण्याची कला अवगत व्हावी यासाठी दि आर्ट ऑफ लिविंग यांच्या सहयोगाने बेसिक कोर्सचे आयोजन केले.यातून ताणतणाव मुक्ती,सकारात्मक दृष्टिकोन,योग,प्राणायाम व सुदर्शन क्रियेचा लाभ शेकडो व्यक्तींनी घेतला.
21)शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण:-
जानेवारी 2015 मध्ये गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनाच्या मार्गदर्शनाखाली शाळाबाह्य मुलाचे सर्वेक्षण या विषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.त्यानंतर रासेयोच्या स्वयंसेवकांनी वासनगाव,हरंगूळ,बुधोडा येथे जाऊन शाळाबाह्य मुलाचे सर्वेक्षण केले.
22)मोफत साडी चोळीचे वाटप:-
दत्तक ग्राम रामगीर नगर येथील आर्थिकदृष्टया मागासलेल्या महिलांना साडी व चोळीचे मोफत वाटप करण्यात आले.
23)वाचनालय व ग्रंथालय:-
दत्तकवस्ती रामगीर नगर येथे NSS च्या वतीने मोफत ग्रंथालय व वाचनालय सुरु केले
24)शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रबोधन:-
दुष्काळी परिस्थिती मुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांना आत्महतेपासून प्रवृत्त करण्यासाठी nss स्वयंसेवकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन केले.
25)प्लास्टिक कॅरीबॅग मुक्त अभियान:-
प्लास्टिक कॅरीबॅग मुक्त अभियान अंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले व जनजागृती करण्यात आली.
26)असंघटित घरेलू(मोलकरीण) सर्वे 2018:-
दि 24 एप्रिल 2018 रोजी अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटना यांच्या सहयोगाने असंघटित घरेलू(मोलकरीण) सर्वे 2018 कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.तसेच Nss स्वयंसेवकांनी अशा कामगारांचा सर्वे केला.
27)एक मूल-एक झाड:-
महाविद्यालयातील विद्यार्थीसाठी एक मूल- एक झाड योजनेचे आयोजन केले.यातून शेकडो विद्यार्थ्यांनी झाड लावून त्याचे संगोपन केले.
28)युवा संसदेचे आयोजन:-
महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवा संसदेचे आयोजन करून युवा माने ,विचार जाणून घेतले.