संगीत महोत्सव
.
संगीत महोत्सवाचे आयोजन-
१) चैत्रपल्लवी संगीत महोत्सव:-
नववर्षाच्या स्वागतासाठी २००२ पासून प्रारंभ.
भजन ,भारुड,गोंधळ,वाघ्या मुरळी,लावणी ,भारुड,पोवाडे,गौळण इ.लोककलांचे सादरीकरण करून लोककलांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला.
२) भूपाळी ते भैरवी:-
नॅक मूल्यांकन समिती समोर व महाविद्यालयातील स्नेहसंमेलनात महाराष्ट्रातील अस्सल लोकलांचे दर्शन घडवून मूल्यांकन समिती व विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
३) महाराष्ट्राची लोकधारा:-
अभाविप लातूर यांच्या वतीने सुट्टीतील कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्राची लोकधारा हा मराठमोळा कार्यक्रम सादर करून लोककला संवर्धनाचे कार्य केले.
४) लोकरंग:-
पुणे येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय प्रतिभा संगम साहित्य संमेलनात लोककलांवर आधारित ‘लोकरंग’या कार्यक्रमाचे सादरीकरण केले.या कार्यक्रमाचा आनंद महाराष्ट्र व गोवा येथील युवा साहित्यिकांनी घेतला.
५) महाराष्ट्र रंग लोककला महोत्सव:-
*महाराष्ट्र रंग
… रंग परंपरेचा
… रंग लोककलेचा
(राज्यस्तरीय लोककला महोत्सव व स्पर्धा )
संतांची मायभूमी असलेला हा महाराष्ट्र सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा अग्रेसर आहे. महाराष्ट्राने आपली संस्कृती,परंपरा जपल्या,वाढवल्या व पुढच्या पिढी पर्यंत सोपवल्या.
महाराष्ट्राकडे अनमोल सांस्कृतिक वैभव आहे आणि ते सांस्कृतिक वैभव महाराष्ट्राने टिकवलं. आज ची पिढी सुद्धा तो वारसा पुढे चालवत आहे. या पिढीला प्रोत्साहन देण्याची. “राष्ट्रीय कला मंच” ने हाच उद्देश समोर ठेऊन “महाराष्ट्र रंग” हा राज्यस्तरीय ‘लोककला महोत्सव’औरंगाबाद येथे १० मे २०१९ रोजी आयोजित केला.या आयोजन समितीत महत्वपूर्ण भूमिका निभावली.
६) स्व.शकुंतलादेवी चिगरी संगीत महोत्सव:-
शास्त्रिय संगीत रुजविण्यासाठी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलावंतांच्या गायन वादनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले.
७) आवर्तन मासिक संगीत सभा :-
लातूर जिल्ह्यात अभिजात संगीताचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी मागील ५०महिन्यांपासून अविरत मासिक संगीत सभेचे आयोजन करण्यात येत आहे.आवर्तन प्रतिष्ठानचा संस्थापक सदस्य व पदाधिकारी म्हणून कार्यरत.
८) स्वर झंकार संगीतोत्सव:-पं.अतुलकुमार उपाध्ये यांच्या स्वर झंकार संस्थेच्या सहयोगाने लातूर शहरात 2 वेळा स्वर झंकार संगीतोत्सवाचे आयोजन केले.
९) पं.वि.दि.पलुस्कर संगीत महोत्सव:-
पं.वि.दि.पलुस्कर यांच्या पुण्यतिथी निमित्य संगीतोत्सवाचे आयोजन केले वाभिजत संगीत प्रचारात योगदान दिले.