माझ्याबद्दल
.
नाव:- प्रा.डॉ. जगदाळे संदिपान गुरुनाथ
जन्मतारीख:-१७/०७/१९७३
पत्ता-१०० साईधाम,नवीन खाडगाव रोड,लातूर ४१३ ५३१
भ्रमणध्वनी:-८२७५४५४६९६
ईमेल:-sandeepjagdale17@gmail.com
शिक्षण:-एम.ए.(संगीत),एम.ए.(इंग्रजी),बी.एड,नेट(संगीत) पीएच.डी.(संगीत),संगीत विशारद,संगीत अलंकार,संगीत भास्कर,योग शिक्षक पदविका,एम.एस.सी.आय.टी.
सेवा:-1999 पासून दयानंद कला महाविद्यालय,लातूर येथे संगीत विषयाचे अद्यापक म्हणून कार्यरत.
प्रा.डॉ.संदिपान गुरुनाथ जगदाळे हे 1999पासून दयानंद कला महाविद्यालयात संगीत विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी संगीत अलंकार,संगीत भास्कर, एम.ए.(संगीत),एम.ए.( इंग्रजी),नेट (संगीत),पीएच.डी (संगीत) बीएड, योगशिक्षक पदविका,एम.एस.सी.आय.टी.पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे.
उपक्रमशील अद्यापक
डॉ.जगदाळे यांनी संगीत विभागातून इयत्ता अकरावी व बारावी साठी अनेक नवनवीन प्रयोग व उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणा दिली आहे.अकरावीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत,बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देणे,उत्कृष्ट वाचक योजना, विद्यार्थ्यांचे बुक बँक, सेवालयातील एचआयव्हीबाधित विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तकांचे व शैक्षणिक साहित्याचे वाटप, चिमण्यांसाठी पाणपोई, कवी व साहित्यिक यांची भेट,संगीतकारांची भेट, स्व गुणवाढ पारितोषिक योजना इत्यादी विविध सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून डॉ.जगदाळे यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात मोलाचे योगदान दिले आहे.
तंत्रस्नेही अध्यापक
डॉ. जगदाळे हे तंत्रस्नेही अध्यापक आहेत. त्यांनी इयत्ता अकरावी व बारावीच्या तालवाद्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 23 चित्रफिती निर्माण करून युट्युब वर अपलोड केल्या आहेत.याचा लाभ इयत्ता अकरावी व बारावीचे विद्यार्थी तर घेत आहेतच त्याचबरोबर गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या विद्यार्थीना सुद्धा याचा फायदा होत आहे.www.sandeepjagdale.com या नावाने वेबसाईट सुरू केली आहे.ज्यातून संगीत विषयाचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सांगीतिक पुस्तके,नोट्स,चित्रफिती ऑनलाईन परीक्षा इ.उपलब्ध असणार आहे.
प्रतीतयश लेखक
डॉ.जगदाळे यांनी आज पर्यंत13 सांगीतिक ग्रंथांचे लेखन केले आहे. यातील काही ग्रंथ ‘अमेरिका’ व ‘कॅनडा’ या देशात पोहोंचले आहेत. एवढेच नाही तर विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा,कार्यशाळा व चर्चासत्रातून सुद्धा त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचे मुखपत्र असले ‘शिक्षण संक्रमण’ अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे ‘संगीत कला विहार’ या मासिकात बरोबरच दै.लोकसत्ता,दै.लोकमत,दै. पुण्यनगरी,दै.एकमत,दै.मराठवडा नेता इत्यादी वृत्तपत्रातून सांगीतिक,संस्कृतिक लेखनाबरोबरच सामाजिक समस्यांना वाचा फोडणारे लेख लिहून प्रबोधन केले आहे.
शाहीर व लोककलावंत
डॉ.जगदाळे यांनी ‘शौर्यगाथा शिवबांची’ या पोवाडे,शिवगीतं,गोंधळ व लोकगीतांच्या कार्यक्रमातून प्रबोधन करण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांबरोबरच आंध्र प्रदेशातील तिरुपती, राजस्थान मधील जयपूर दिल्ली येथे त्यांनी आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून लोककला संवर्धनाबरोबरच विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे डॉ.जगदाळे हे स्वलिखित पोवाडे सादर करतात. तसेच त्यांनी अनेक भारुडं,आंबेडकरी जलसे व कथा लिहिलेल्या आहेत.या भारुड,जलसे व कथांना स्वारातीम विद्यापीठ नांदेड आयोजित युवक महोत्सवात अनेक पारितोषिके मिळाली आहेत.
उत्तम आयोजक
डॉ जगदाळे हे उत्तम आयोजक आहेत.त्यांनी सुरताल संगीत महाविद्यालय,रणसम्राट क्रीडा व सांस्कृतिक मंडळ,सुरश्री प्रतिष्ठाण व आवर्तन प्रतिष्ठाण यांनी आयोजित केलेल्या संगीत महोत्सवांच्या आयोजनात मोलाचे योगदान दिले आहे.
सामाजिक जाण असलेले अद्यापक
डॉ.जगदाळे हे 2013 पासून दयानंद कला महाविद्यालय +2 स्तर रासेयो कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
मळवटी (2013),निवडा (2014),लखमापूर (2015),महापूर (2016),आनंदवाडी गौर (2017) आनंदवाडी गौर,(2018) येथे हागणदारी मुक्त ग्राम करण्यासाठी शोषखड्डे,जलव्यवस्थापन,निर्मलग्राम,पाट बंधारे बांधणे,वनराई बंधारा बांधणे, ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन,साक्षरता,वृक्षारोपण,स्त्री सुरक्षा,स्त्री-आरोग्य,कॅशलेस व्यवहार प्रशिक्षण, योगा प्राणायाम शिबिर,शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण,पल्स पोलिओ जनजागृती,गावाचे आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण,विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक व ग्रामस्थांसाठी प्रबोधनात्मक संस्कृतीक, कार्यक्रमाचे आयोजन केले.
लातूर जवळील रामगिर नगर झोपडपट्टी या दलित वस्तीला दत्तक घेऊन तेथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या.साडी वाटप, आरोग्य शिबिर, होलिकोत्सव,ग्रंथालयाची सोय इ. उपक्रम राबविले
2016 पासून +2 स्तरावर राष्ट्रीय सेवा योजनेचा लातूर जिल्हा समन्वयक म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी नियुक्ती केली.
जिल्ह्यातील सर्व रासेयो केंद्र क्रियाशील करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
उत्तम व्याख्याते
मराठवाड्यातील अनेक महाविद्यालयातील स्नेहसंमेलन विविध विद्यापीठातील युवक महोत्सवाचे उद्घाटन इत्यादी कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज व वर्तमान स्थिती,अभ्यास एक तंत्र , स्वामी विवेकानंद यांचे शैक्षणिक विचार, गुरु-शिष्य परंपरा,युवकांसमोरील आव्हाने, इत्यादी विषयांवर प्रबोधनात्मक व्याख्याने दिली आहेत.
मराठी बायोडेटा डाउनलोड । इंग्रजी बायोडेटा डाउनलोड
…