प्रा.डॉ.संदिपान गुरुनाथ जगदाळे हे 1999पासून दयानंद कला महाविद्यालयात संगीत विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी संगीत अलंकार,संगीत भास्कर, एम.ए.(संगीत),एम.ए.( इंग्रजी),नेट (संगीत),पीएच.डी (संगीत) बीएड, योगशिक्षक पदविका,एम.एस.सी.आय.टी.पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे.
तंत्रस्नेही अध्यापक
डॉ. जगदाळे हे तंत्रस्नेही अध्यापक आहेत. त्यांनी इयत्ता अकरावी व बारावीच्या तालवाद्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 23 चित्रफिती निर्माण करून युट्युब वर अपलोड केल्या आहेत.याचा लाभ इयत्ता अकरावी व बारावीचे विद्यार्थी तर घेत आहेतच त्याचबरोबर गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या विद्यार्थीना सुद्धा याचा फायदा होत आहे.www.sandeepjagdale.com या नावाने वेबसाईट सुरू केली आहे.ज्यातून संगीत विषयाचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सांगीतिक पुस्तके,नोट्स,चित्रफिती ऑनलाईन परीक्षा इ.उपलब्ध असणार आहे.
शाहीर व लोककलावंत
डॉ.जगदाळे यांनी ‘शौर्यगाथा शिवबांची’ या पोवाडे,शिवगीतं,गोंधळ व लोकगीतांच्या कार्यक्रमातून प्रबोधन करण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांबरोबरच आंध्र प्रदेशातील तिरुपती, राजस्थान मधील जयपूर दिल्ली येथे त्यांनी आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून लोककला संवर्धनाबरोबरच विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे डॉ.जगदाळे हे स्वलिखित पोवाडे सादर करतात. तसेच त्यांनी अनेक भारुडं,आंबेडकरी जलसे व कथा लिहिलेल्या आहेत.या भारुड,जलसे व कथांना स्वारातीम विद्यापीठ नांदेड आयोजित युवक महोत्सवात अनेक पारितोषिके मिळाली आहेत.